www.24taas.com, झी मीडिया, फ्रांन्स
जगाची महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या अमेरीकेबाबत एक विचित्र असा दावा एका फ्रेंच महिलेनं केला आहे. या फ्रेंच महिलेचा दावा आहे की, तिचं नाव दहशतवादी संघटनेच्या नावाशी जुळून येत असल्यानं, तिला अमेरीकेत प्रवेश बंदी करण्यात आली.
ब्रिटिश वृत्तपत्राच्या दाव्यानूसार, आयदा अॅलिक ही आपल्या कुटुंबियांसोबत न्यूयॉर्कला सुट्टी निमित्त फिरायला जाणार होती. एअरपोर्टला पोहचल्यावर अमेरीकन अधिकाऱ्यांनी तिला अमेरीकेत येण्यास परवानगी नाकारली असल्याचा संदेश सांगितला. याबाबत विचारणा केली तेव्हा अॅलिकला स्टाफने पूर्ण माहिती दिली नाही.
याबाबत इंटरनेटवर शोध घेतल्यावर अॅलिकला आढळून आलं की, पासपोर्टमध्ये आधी आडनाव लिहून नंतर नाव लिहण्याची पद्धत असते. या कारणानं तिचं नाव हे `अॅलिक आयदा` असं होतं. या शब्दांचं उच्चारण `अलकायदा` असं होतं. या कारणानंच अॅलिकला अमेरीकेत प्रवेश नाकारण्यात आला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.