'कलाम सामान्य वैज्ञानिक होते'... पाकच्या वैज्ञानिकानं उघडलं थोबाड!

'मिसाईल मॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताचे माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्याबद्दल पाकिस्तानच्या एका वैज्ञानिकानं आक्षेपार्ह आणि खेदजनक वक्तव्य केलंय. 

Updated: Jul 29, 2015, 11:16 AM IST
'कलाम सामान्य वैज्ञानिक होते'...  पाकच्या वैज्ञानिकानं उघडलं थोबाड! title=

नवी दिल्ली : 'मिसाईल मॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताचे माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्याबद्दल पाकिस्तानच्या एका वैज्ञानिकानं आक्षेपार्ह आणि खेदजनक वक्तव्य केलंय. 

पाकिस्तानच्या परमाणु अभियानाचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ए क्यू खान यांनी कलाम यांना 'कलाम हे एक सामान्य वैज्ञानिक होते' असं म्हणत हिणवलंय. 

'बीबीसी न्यूज'शी बोलताना खान यांनी हे वक्तव्य केलंय. 'कलाम साहेब यांना साधेपणा आवडतं होता ते एक सामान्य वैज्ञानिक होते. डॉक्टर अब्दुल कलाम यांनी काही मोठं भरीव काम केल्याचं मला तरी आठवत नाही... भारताचा मिसाईल कार्यक्रमही रशियाच्या साहाय्यानं विकसित करण्यात आला होता' असं खान यांनी म्हटलंय. 
 
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांचं सोमवारी शिलॉंगमध्ये असताना निधन झालं. डॉक्टर. कलाम हे २००२ साली भाजप सरकारच्या कार्यकाळात राष्ट्रपती बनले होते. ए क्यू खान यांच्या म्हणण्यानुसार, 'भाजपला मुस्लिमांचा विश्वास जिंकून मत मिळवायची होती... म्हणूनच कलाम यांना राष्ट्रपती बनवण्यात आलं होतं'.

डॉ. कलाम यांच्या निधनामुळे भारतात सर्वच स्तरांतून हळहळ व्यक्त होतेय. अशात पाकिस्तानच्या वैज्ञानिकाच्या या वक्तव्य केवळ लज्जास्पद असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होतेय. 

भारतातील सुरक्षा यंत्रणेला मजबूत करण्याचं स्वप्न पाहणं आणि ते साकार करणं याचं संपूर्ण श्रेय डॉ. कलाम यांनाच जातं. देशाचे उपग्रह कार्यक्रम, मिसाईल योजना, अणुबॉम्ब असो किंवा कमी वजनाचे लढवय्ये विमानं... या सर्व योजनांत डॉ. कलाम यांचं योगदान उल्लेखनीय आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.