प्रयोगशाळेत रक्त बनवणं 2017 मध्ये होईल शक्य

स्टेम सेलपासून प्रयोगशाळेत बनवल्या गेलेल्या कृत्रिम रक्ताचं मानवी परीक्षण 2017 मध्ये होणार आहे. ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ स्कीमने (NHS) येत्या दोन वर्षांत प्रयोगशाळेत बनलेल्या रक्ताच्या क्लिनिकल ट्रायल्सची घोषणा केली आहे. 

Updated: Jun 29, 2015, 01:20 PM IST
प्रयोगशाळेत रक्त बनवणं 2017 मध्ये होईल शक्य title=

लंडन : स्टेम सेलपासून प्रयोगशाळेत बनवल्या गेलेल्या कृत्रिम रक्ताचं मानवी परीक्षण 2017 मध्ये होणार आहे. ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ स्कीमने (NHS) येत्या दोन वर्षांत प्रयोगशाळेत बनलेल्या रक्ताच्या क्लिनिकल ट्रायल्सची घोषणा केली आहे. 

यूनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल आणि NHS ब्लड अँड ट्रान्सप्लांटच्या संशोधकांनी माणसाच्या स्टेम सेल आणि अंबिलिकल कॉर्डच्या रक्ताचा वापर करून कृत्रिम रक्ताची निर्मिती केली आहे. 
प्रयोगशाळेत बनवल्या जाणाऱ्या या रक्तामुळे एनिमिया आणि थॅलेसीमियासारख्या आजारांनी ग्रस्त रूग्णांना दिलासा मिळणार आहे. अशा प्रकारच्या रूग्णांना रक्तदात्याच्या शोधात फिरावे लागणार नाही.

क्लिनिकल ट्रायलमध्ये हे कृत्रिम रक्त सामान्य रक्तासारखेच काम करते का याचा अभ्यास केला जाणार आहे. 20 लोकांवर हा प्रयोग केला जाणार असून एका गटाला 5 ते 10 मिली रक्त चढवले जाईल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.