VIDEO : सेल्फीच्या नादात आपल्याचं डोक्याच्या चिंधड्या उडवल्या

सेल्फीच्या चक्करमध्ये एका तरुणानं आपला जीव गमावल्याची हृदयद्रावक घटना पुन्हा एकदा घडलीय. धक्कादायक म्हणजे, ही घटना कॅमेऱ्यातही कैद झालीय... आणि हा व्हिडिओ वायरल होतोय.

Updated: Mar 3, 2016, 03:41 PM IST
VIDEO : सेल्फीच्या नादात आपल्याचं डोक्याच्या चिंधड्या उडवल्या

लंडन : सेल्फीच्या चक्करमध्ये एका तरुणानं आपला जीव गमावल्याची हृदयद्रावक घटना पुन्हा एकदा घडलीय. धक्कादायक म्हणजे, ही घटना कॅमेऱ्यातही कैद झालीय... आणि हा व्हिडिओ वायरल होतोय.

लंडनमध्ये ही घटना घडलीय. सेल्फीच्या नादात एका तरुणानं आपल्या कपाळावर बंदुक धरली... पहिल्यांदा त्यानं रिव्हॉल्व्हरचा निशाणा धरला... आणि ट्रिगर दाबला... पण हा स्लॉट रिकामा होता... दुसऱ्यांदाही त्यानं हाच प्रयत्न केला... पण, यावेळी मात्र त्याचं दुर्देवं आडवं आलं... ट्रिगर दाबला गेला आणि या गोळीनं सरळ त्याच्या डोक्याच्या चिंधड्या उडवल्या.