बराक ओबामा तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी भारताकडे रवाना...

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत दौऱ्यासाठी वॉशिंग्टनहून रवाना झालेत. मेसीलँड इथल्या अँड्यूज एअरबेसवरुन ओबामा आणि फर्स्ट लेडी मिशेल एअरफोर्स वन विमानानं भारत दौ-यासाठी रवाना झालेत..  

Updated: Jan 24, 2015, 11:55 PM IST
बराक ओबामा तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी भारताकडे रवाना...  title=

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत दौऱ्यासाठी वॉशिंग्टनहून रवाना झालेत. मेसीलँड इथल्या अँड्यूज एअरबेसवरुन ओबामा आणि फर्स्ट लेडी मिशेल एअरफोर्स वन विमानानं भारत दौ-यासाठी रवाना झालेत.. रविवारी सकाळी दहा वाजता ओबामा भारतात पोहचतील.  बराक ओबामा यांचा हा तीन दिवसीय भारत दौरा आहे.. भारताच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी ओबामा प्रमुख अतिथी आहेत..  

असा असेल ओबामांचा भारत दौरा... 

२५ जानेवारी २०१५ - 

*  सकाळी १० - दिल्लीच्या पालम एअरपोर्टवर आगमन

* दुपारी १२ - राष्ट्रपती भवनात ओबामांना रिसेप्शन 

* दुपारी १२.३० - राजघाटावर गांधीजींना आदरांजली वाहणार

* दुपारी १२.३५ - राजघाटावर वृक्षारोपण कार्यक्रम

* दुपारी १ - हैदराबाद हाऊसमध्ये लंच आणि ओबामा-मोदींमध्ये बैठक

* दुपारी २.१५ - हैदराबाद हाऊसमध्ये उभयपक्षी चर्चा

* दुपारी ३.०५ - हैदराबाद हाऊसच्या बॉलरुममध्ये प्रसारमाध्यमांसाठी निवेदन 

* सायंकाळी ७.३० - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट

* रात्री ८.०० - राष्ट्रपतींसोबत स्नेहभोजन

२६ जानेवारी २०१५ 

* सकाळी ९.१०  - मौर्या हॉटेलमधून राष्ट्रपती भवनाकडे रवाना

* सकाळी ९.२५   - राष्ट्रपती भवनात दाखल

* सकाळी १० - प्रजासत्ताक दिन संचलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती

* दुपारी ३.५० - राष्ट्रपतींकडून रिसेप्शन 

* सायंकाळी ५.३०  - हॉटेल ताज पॅलेस इथं इंडो-युएस सीईओंसह ओबामा- मोदी राऊंड टेबल चर्चा 

* सायंकाळी ६.४० - ताज पॅलेसच्या दरबार हॉलमध्ये इंडिया - यूएस बिझनेस कौन्सिल यांची बैठक 

२७ जानेवारी २०१५ 

* सकाळी १०.३० - फोर्ट ऑडिटोरिअममध्ये ओबामांचं भाषण

* दुपारी १.५०  - दिल्लीतून प्रस्थान 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.