बराक ओबामा यांच्यासोबत दाखल होणार हा 'भारतीय'

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रविवारी सकाळी भारतात दाखल होणार आहेत. त्यांच्यासोबत भारतीय मूळ असलेली एक व्यक्तीही सोबत असणर आहे. ही व्यक्ती आहे डॉ. अमरीश बेहरा... 

Updated: Jan 24, 2015, 11:24 PM IST
बराक ओबामा यांच्यासोबत दाखल होणार हा 'भारतीय'

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रविवारी सकाळी भारतात दाखल होणार आहेत. त्यांच्यासोबत भारतीय मूळ असलेली एक व्यक्तीही सोबत असणर आहे. ही व्यक्ती आहे डॉ. अमरीश बेहरा... 

डॉ. अमरीश यांना अमेरिकेत डॉ. अॅमी बेरा याच नावानं ओळखलं जातं. अमरीश यांना भारतात येणार असल्याचा अत्यानंद झालाय. ते या दौऱ्यासाठी खूपच उत्साहीत आहेत. 

अमरीश हे मूळचे पंजाब प्रांतातील. जवळपास ४५-५० वर्षांपूर्वी ते अमेरिकेत जाऊन तिथंच स्थायिक झाले. डॉ. अमरीश हे अमेरिकन काँग्रेसचे कॅलिफोर्नियाचे सदस्य आहेत. ते डेमोक्रेटिक पार्टीचे सदस्य आहेत. २५ जानेवारी रोजी बराक ओबामा यांच्यासोबत तेही भारतात दाखल होणार आहेत. 

ओबामा यांच्यासोबत आपलं दिल्लीत येणं म्हणजे अमेरिकन प्रशासनाला तिथल्या भारतीयांच्या ताकदीची जाणीव असल्याचंच प्रमाण असल्याचं ते म्हणतात. 

हा काळ भारत-अमेरिकेच्या संबंधांसाठी चांगला काळ ठरेल, अशी आशा अमरीश यांना आहे. महत्त्वाचं म्हणजे, भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्तानं प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे ओबामा हे अमेरिकेचे पहिलेच राष्ट्राध्यक्ष आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.