बराक ओबामा हरले बिअरची पैज

अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी नुकत्याच झालेल्या हिवाळी ऑलिंपिकमधील आइस हॉकी सामन्यासाठी पैज लावली होती. खेळांची आवड असणाऱ्या ओबामा यांनी कॅनडाचे पंतप्रधान स्टीफन हार्पर यांच्याशी दोन पेटी बिअरचीही पैज लावली होती.

Updated: Mar 10, 2014, 10:36 AM IST

www.zee24taas.com, झी मीडीया, वॉशिंग्टन
अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी नुकत्याच झालेल्या हिवाळी ऑलिंपिकमधील आइस हॉकी सामन्यासाठी पैज लावली होती. खेळांची आवड असणाऱ्या ओबामा यांनी कॅनडाचे पंतप्रधान स्टीफन हार्पर यांच्याशी दोन पेटी बिअरचीही पैज लावली होती.
मात्र सोच्चीमध्ये झालेल्या आइस हॉकीच्या उपांत्य फेरीत कॅनडाची पुरुष हॉकी संघाने अमेरिकाच्या संघाला १-० ने हरवलं होतं. तसेच महिला संघाने अमेरिकाला ३-२ ने हरवून सुवर्ण पदक मिळवलं होतं. त्यामुळे अमेरिकेला हार मानावी लागली.
हिवाळी ऑलिंपिकमध्ये ठरलेल्या पैजनुसार व्हाईट हाऊसमधून सोमवारी कॅनडाच्या धूतवास यांना दोन पेटी बिअर पाठवली जाणार आहे.
ओबामा आणि स्टीफन हार्पर यांच्यातील ही काही पहिली पैज नव्हती. याआधीही व्हँकुव्हर ऑलिंपिकच्या वेळीसुद्धा दोन्ही नेत्यांनी अशीच पैज लावली होती आणि त्यावेळीही ओबामा यांना हार पत्करावी लागली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.