www.24taas.com,वॉशिंग्टन
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. बराक ओबामा आणि मिंट रोम्नी यांच्यात अटीतटीची लढत होत आहे. रोम्नी यांनी आघाडी घेतली होती. दरम्यान, १६० मते मिळवत रॉम्नींवर ५ मतांनी ओबामा यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे बराक ओबामा पुन्हा अध्यक्ष होणार का याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालांना सुरूवात झाली आहे. वेस्ट वर्जिनियात रोम्नींनी विजय मिळवला आहे. इंडियाना - वर्जियानात रोम्नी आघाडीवर तर फ्लोरोडियात ओबामा पुढे आहेत. विजयासाठी २७० मतांची गरज आहे. सुरूवातीला रॉम्नी (१५३) यांनी ओबामा (१४३) यांच्यावर आघाडी घेतली होती.
त्यानंतर अटीतटीच्या लढतीत ओबामा यांनी १६० मते घेवून रॉम्नी यांच्यावर आघाडी घेतली. रॉम्नी यांना १५५ मते मिळाली आहेत. उटालामध्ये रॉम्नी यांनी विजय संपादन केला आहे.
भारतीय वेळेनुसार आज सकाळी सातनंतर मतमोजणी सुरू झाली. जनमत चाचणीत अध्यक्ष बराक ओबामा व त्यांचे प्रतिस्पर्धी मिंट रोम्नी यांच्यात अगदी कमी अंतर असल्याने, दोन्ही नेते व त्यांचे सर्मथक आतापासून विजयाचा दावा करीत आहेत. न्यू हॅम्पशायर या छोट्याशा गावातील लोकांनी मध्यरात्र उलटताच पहिले मतदान केले. न्यू हॅम्पशायरमधील डिक्सिव्हिले नॉच हे छोटे गाव १९६0पासून पहिले मत टाकते. आतापर्यंत १३पैकी ७ अध्यक्षांना या गावाने कौल दिला आहे.
मतदान सुरू होण्याआधी ओबामा व रोम्नी दोघांच्याही सर्मथकांनी विजयाचा दावा केला. अमेरिकेत मंगळवारी मतदान सुरू झाले असले तरीही एकतृतीयांश मतदारांनी आधीच मतदान केले आहे. न्यू हॅम्पशायरमधील डिक्सिव्हिले नॉच येथे झालेल्या पहिल्याच मतदानात दोघांनाही पाच, पाच मते मिळाली. अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच ही घटना घडली आहे.