पेप्सीकोच्या इंद्रा नूयी यांना ओबामांचं आमंत्रण!

भारतीय वंशाच्या इंद्रा नूयी यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडून आमंत्रण मिळालंय. पेप्सिकोच्या सीईओपदी इंद्रा नूयी या सध्या कार्यरत आहेत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 13, 2012, 09:44 PM IST

www.24taas.com, वॉशिंग्टन
भारतीय वंशाच्या इंद्रा नूयी यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडून आमंत्रण मिळालंय. पेप्सिकोच्या सीईओपदी इंद्रा नूयी या सध्या कार्यरत आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सध्याच्या आर्थिक संकटांवर मात करण्यासाठी व्यवसाय, श्रम याविषयांवर नागरिक आणि काँग्रेस नेत्यांसोबत व्यापक चर्चा करण्यासाठी इंद्रा नूयी यांच्यासमवेत तीन भारतीय अमेरिकन व्यक्तींना आमंत्रित केलंय.
‘सेंटर फॉर अमेरिकन प्रोग्रेस’च्या अध्यक्ष नीरा टंडन आणि ‘सेंटर फॉर कम्युनिटी चेंज’चे दीपक भार्गव यांचा यामध्ये समावेश आहे. बराक ओबामा यांच्याकडून त्यांना चर्चेसाठी आमंत्रण मिळालंय.
व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा या आठवड्यात व्यवसाय, श्रम तसंच प्रगतिशील समाजातील काही लोकांसोबतच काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेऊन सध्याच्या अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणखी काय प्रयत्न करता येतील, याबाबत चर्चा करणार आहेत.