www.24taas.com, झी मीडिया, जॉर्डन
आत्तापर्यंत तुम्ही अनेक प्रकारच्या हाणामाऱ्या पाहिल्या असतील. मात्र, जॉर्डनमध्ये चक्क एका न्यूज चॅनलच्या ‘लाईव्ह’ कार्यक्रमात स्टुडिओचा आखाडाच झालेला पाहायला मिळाला.
संबंधित या चॅनेलवर चर्चात्मक कार्यक्रमादरम्यान दोन पाहुण्यांमधील तीव्र वादाचे पर्यावसान हाणामारीत झालं. विशेष म्हणजे चर्चेत कुणी सामान्य नागरिक सहभागी झालेले नव्हते तर मीडियातलेच मोठे पदाधिकारी यात चर्चेसाठी उपस्थित झाले होते.
सीरियातल्या माध्यमांच्या स्वातंत्र्यावर चर्चा सुरू असताना जॉर्डनमधल्य़ा ‘इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशन’चे अध्यक्ष शेर-अल जोहरी आणि ‘अल मुश्तबाल अल अरबी’ या बेबसाईटचे मुख्य संपादक मोहम्मद अल जायुसी यांच्यात वाद झाला.
सीरिया सरकारधार्जिण्या धोरणांच्या आरोपांवरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. दोघे एवढ्यावरच थांबले नाहीत. दोघे थेट टेबलच उलथा-पालथा करत एकमेकांना भिडले. या दोघांच्या हाणामारीत स्टुडिओचेही मोठे नुकसान झालंय.
व्हिडिओ पाहा -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.