बर्लिन : जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये ख्रिसमससाठी सजलेल्या बाजारपेठेमध्ये ट्रक घुसवून १२ जाणांचा जीव घेणाऱ्या हल्ल्याची जबाबदारी ISISने घेतली आहे.
या दहशतवादी हल्ल्यात ख्रिसमस मार्केटमधील १२ जण ठार झाले तर ४८ जण जखमी झाले. ISIS संबंधित अमाक न्यूज एजन्सीने यासंबंधी वृत्त दिलं आहे. ISISने ऑनलाइन स्टेटमेंट जाहीर करत आपल्याच दहशतवाद्याने बर्लिनमध्ये हल्ला करत नागरिकांना टार्गेट केल्याचं म्हटलेय.
दरम्यान, या दहशतवाद्याची ओळख उघड करण्यात आलेली नाही. सोमवारी रात्री बर्लिनमधील मार्केटमध्ये ट्रक घुसल्याने १२ जणांचा मृत्यू झाला. हा हल्ला दहशतवाद्यानेच घडवला असल्याचे जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी मंगळवारी म्हटले होते.