ब्रिटनमध्ये मोदींचे जोरदार स्वागत करणार

बिहारमध्ये भाजपच्या पराभवाने पंतप्रधान मोदींवर टीका होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीत लंडन दौ-यावर जातायत... पण या ठिकाणी त्याच्या स्वागतासाठी भारतीय आयोजकांनी जोरदार तयारी केली आहे.  

Updated: Nov 11, 2015, 08:48 PM IST
 ब्रिटनमध्ये मोदींचे जोरदार स्वागत करणार  title=

लंडन : बिहारमध्ये भाजपच्या पराभवाने पंतप्रधान मोदींवर टीका होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळीत लंडन दौ-यावर जातायत... पण या ठिकाणी त्याच्या स्वागतासाठी भारतीय आयोजकांनी जोरदार तयारी केली आहे.  

तीन दिवसांच्या दौऱ्यावर मोदी ब्रिटनला जाणार आहे. लंडन दौ-यादरम्यान पंतप्रधान मोदींचं भाषण होणारेय... ज्या वेंम्बले स्टेडियमवर मोदींचं भाषण होणारेय त्या ठिकाणी सध्या जोरदार तयारी सुरू आहे... 

लंडनमध्ये दिवाळी साजरी 
लंडनमध्येही भारतीय परंपरेसह दिवाळी साजरी केली जाते... भारतीय वंशाच्या लोकांसह ब्रिटनमध्ये राहणा-या इतर कुटुंबांसह दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करतात... बंगाली, पंजाबी आणि मराठी भाषिक लोक सोबत दिवाळीचा आनंद लुटतात... दरवर्षी लंडनच्या प्रसिद्ध ट्रफेलेगर स्क्वेअरमध्ये दिवाळी साजरी करतात...त्यात लंडनचे मेयरही मोठ्या उत्साहात सहभागी होतात...लंडनमध्ये जवळपास 15 लाख भारतीयांचं वास्तव्य आहे...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.