ब्रसेल्स पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने हादरलं

३ दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ल्याने हादरलेल्या बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये पुन्हा एकदा स्फोट झाल्याची माहिती आहे. ब्रसेल्सच्या स्चारबीक जिल्ह्यामधील एका घरात शोध मोहिम सुरु असताना स्फोटाचा मोठा आवाज झाल्याचे वृत्त आहे.

Updated: Mar 25, 2016, 10:43 PM IST
ब्रसेल्स पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाने हादरलं title=

ब्रसेल्स : ३ दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ल्याने हादरलेल्या बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये पुन्हा एकदा स्फोट झाल्याची माहिती आहे. ब्रसेल्सच्या स्चारबीक जिल्ह्यामधील एका घरात शोध मोहिम सुरु असताना स्फोटाचा मोठा आवाज झाल्याचे वृत्त आहे.

या स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, सुरक्षापथकांनी एका व्यक्तीला अटक केली आहे पण याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 

ब्रसेल्समध्ये अतिरेक्यांनी विमानतळावर दोन आणि मेट्रो स्थानकात एक असे ३ स्फोट घडवून आणले होते. या स्फोटामध्ये ३१ जण ठार झाले तर ३१६ जण जखमी झाले होते.
  
आतापर्यंत या प्रकरणात ६ जणांना अटक करण्यात आली असून इसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.