इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये स्फोट

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता शहर गुरुवारी सकाळी स्फोटांनी तसेच गोळीबाराने हादरलं. एकापाठोपाठ सहा ठिकाणी झालेल्या स्फोटामध्ये तीन पोलिसांसह तीन नागरिक ठार झाल्याची माहिती आहे. 

Updated: Jan 14, 2016, 01:14 PM IST
 इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये स्फोट title=

जकार्ता : इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये हल्ला झालाय. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार किमान 6 ठिकाणी स्फोट झालेत. यातला एक स्फोट संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयाजवळ झाल्याचं समजतंय. आतापर्यंत तीन पोलिसांसह किमान सहा जण ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. 

रॉयटर्सच्या एका फोटोग्राफरन दिलेल्या माहितीनुसार स्टारबक्स या कॅफेमध्ये स्फोट झालाय. तसंच एका गच्चीवर लपून बसलेल्या अतिरेक्यांनी गोळीबार केल्याचंही या प्रत्यक्षदर्शीनं सांगितलंय. 

विशेष म्हणजे, गेल्या काही आठवड्यांपासून अतिरेकी हल्ल्याचा धोका असल्याचा इशारा इंडोनेशियाला मिळाला होता. त्यानुसार पोलिसांनी अनेक भागात शोधमोहीमही राबवली होती. दरम्यान, ऑस्ट्रेलियात सिडनीमध्येही अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे तिथलं जगप्रसिद्ध ऑपेरा हाऊस रिकामं करण्यात आलंय.