टेनेसी: एका कुत्र्याच्या पिल्लावरून दोन मुलांमध्ये भांडण झालं. प्रकरण इतकं वाढलं की, एका ११ वर्षाच्या मुलानं ८ वर्षाच्या मुलीची गोळी मारून हत्या केली. अमेरिकेतील टेनेसी इथं ही दुख:द घटना घडलीय.
मृत मुलीची आई लताशा डायर यांनी सांगितलं, त्यांची मुलगी घराबाहेर खेळत होती. तेव्हा शेजारचा मुलगा तिचं कुत्र्याचं पिल्लू पाहायला आला. मैकायला नावाच्या या मुलीनं पिल्लू दाखवायला नकार दिला तर त्यानं तिच्या छातीवर गोळी मारली. लताशानं रविवारी एका टिव्ही स्टेशनच्या वेबसाइटवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओत सांगतिलं,'जेव्हा आम्ही व्हाइट पाइन इथं गेलो होतो तेव्हा पण हा मुलगी मैकायलाला त्रास देत होता. तो तिची खिल्ली उडवायचा, तिला विचित्र नावांनी बोलवायचा. मी अखेर शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार केली. त्यानंतर त्यानं त्रास देणं थांबवलं पण अचानक तिला गोळी मारली.'
लताशा हे सांगतांना खूप भावूक झाली होती. मैकायला आपल्या आईची लताशाची खूप लाडकी होती. आपण कितीही खराब मूडमध्ये असो, तिच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असायचं, असं लताशा सांगते.
दरम्यान, जेफरसन काउंटीच्या शेरिफ जी डब्ल्यू 'बड' मॅकोइगनं मुलावर फर्स्ट डिग्री हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याला अल्पवयीन मुलांच्या कारागृहात पाठवलंय.
मॅकोईग यांनी सांगितलं, मुलानं आपल्या वडिलांच्या १२ शॉज शॉटगनमधून आपल्या घरातून गोळी झाडली. शनिवारी संध्याकाळी साडे सातची ही घटना आहे. हे दोन्ही मुलं शेजारी होते. एकमेकांना नीट ओळखायचे. एकत्र शाळेतही जायचे.
आणखी वाचा - ख्रिश्चन ग्रुपची भविष्यवाणी, बुधवारी 'जग संपणार"
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.