बीजिंग : मेंदूत रक्तस्राव झाल्यानं जवळपास सहा महिने कोमात असलेला एक तरुण आईच्या एका हाकेने उठून बसलाय. कानांवर विश्वास बसणार नाही पण चीनमध्ये ही घटना प्रत्यक्षात घडलीय.
बिजिंग केहुबई इथल्या महाविद्यालयात शिकणाऱ्या यू पिंजिया या तरुणाच्या याच्या डोक्यात रक्तस्राव झाला
तीन वेगवेगळ्या रुग्णालयांतील डॉक्टरांनी त्याच्यावर तब्बल पाच वेळा शस्त्रक्रिया केली तरी तो तरुण कोमातून बाहेर आला नाही. त्यामुळे डॉक्टरांची आशाही पूर्णपणे मावळली होती. 'यू'च्या आईनं मात्र आशा सोडली नाही... तिला, आपला मुलगा या संकटातून बाहेर येईल अशी पूर्ण खात्री होती आणि झालंही तसंच...
डॉक्टरांनी 'यू'वर पाच वेळा शस्त्रक्रिया केल्या तरी त्याची तो कोमामधून बाहेर आला नव्हता. यावेळी, 'यू'ची आई मात्र रोज त्याच्याजवळ बसून त्याच्याशी संवाद साधायची... एके दिवशी असाच संवाद साधत असताना 'यू'च्या आईनं त्याला कळवळून हाक मारली... आणि आपल्या आईचा तो करुणामय आवाज 'यू'च्या कानापर्यंत पोहोचला...
सिनेमात घडावं तसं त्यानं पटकन डोळे उघडले आणि तो चक्क उठूनच बसला... समोरचं दृश्यं पाहून डॉक्टरांनाही आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठिण झालं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.