VIDEO : एक पेटिंग कसं खराब झाले हे ४ कोटी लोकांनी पाहिले

चीनच्या शांघाई शहरात दुर्मिळ चित्रांचं प्रदर्शन भरलं होतं, प्रदर्शनातील पेटिंग्ज जुन्या आहेत. मात्र एका १२ वर्षाच्या मुलाचा चुकून तोल गेला (व्हिडीओत पाहा) आणि त्याचा हात पेटिंगमधून आरपार निघाला. 

Updated: Aug 26, 2015, 04:15 PM IST
VIDEO : एक पेटिंग कसं खराब झाले हे ४ कोटी लोकांनी पाहिले title=

शांघाई : चीनच्या शांघाई शहरात दुर्मिळ चित्रांचं प्रदर्शन भरलं होतं, प्रदर्शनातील पेटिंग्ज जुन्या आहेत. मात्र एका १२ वर्षाच्या मुलाचा चुकून तोल गेला (खालील व्हिडीओत पाहा) आणि त्याचा हात पेटिंगमधून आरपार निघाला. 

या घटनेमुळे पेटिंग्ज खराब झालंय, या पेटिंगची किंमत ९ कोटी रूपये असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलो पोरपोरा  हे ऑईल पेंट पेटिंग आहे, हे सतराव्या शतकातलं पेटिंग आहे. हे पेटिंग आता सुधारण्याच प्रयत्न केला जात आहे. 

ज्याचा तोल गेल्याने पेटिंग खराब झालं तो मुलगा घाबरला आहे, पण ही आयोजकांची चूक असल्याचं सांगण्यात येत आहे. पेटिंगसमोर कोणतीही संरक्षणात्मक उपाय योजना करण्यात आलेली नाही.

पाहा, कसं खराब झालं सतराव्या शतकातलं दुर्मिळ पेटिंग

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.