तरूणाला मागून चावला साप, पाहा काय होती त्याची रिअॅक्शन

 थायलंडमधील एका सायबर कॅफेमध्ये अचानक साप घुसला आणि त्याने उडी घेत तरूणाच्या पार्श्वभागाचा चावा घेतला. त्यावेळी या तरूणाने आपली सुटका कशी करून घेतली याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 13, 2017, 03:50 PM IST
तरूणाला मागून चावला साप, पाहा काय होती त्याची रिअॅक्शन  title=

बँकॉक :  थायलंडमधील एका सायबर कॅफेमध्ये अचानक साप घुसला आणि त्याने उडी घेत तरूणाच्या पार्श्वभागाचा चावा घेतला. त्यावेळी या तरूणाने आपली सुटका कशी करून घेतली याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

सायबर कॅफेमध्ये दुपारच्या वेळेला सर्व जण आपआपल्या कम्प्युटरमध्ये मग्न होते. त्यावेळी अचानक एक मुलगा उठला आणि त्याने दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यावर बाहेर असलेल्या सापाने त्याच्या अंगावर उडी घेतली आणि त्याचा पार्श्वभागाचा चावा घेतला. तरूण घाबरला आणि गडाबडा लोळायला  लागला. सापाने त्याची पकड सोडली आणि तो कोपऱ्या पळून गेला. 

हा प्रकार इतक्या लवकर झाला की, सायबर कॅफेमधील अनेकांना कळालेच नाही.  जेव्हा कळाले तेव्हा जोरदार धावपळ झाली... 

पाहा हा व्हिडिओ....