... म्हणून लग्नाच्या पहिल्या रात्रीच त्याची पत्नीला मारहाण

नवरा-बायकोची भांडणं ही काही नवी नाहीत. मात्र लग्नाच्या पहिल्याच रात्री पत्नीला जबर मारहाण करणारा नवरा ना आपण कधी पाहिला असेल ना ऐकला असेल. या मारहाणीचं कारणही जरा विचित्रच आहे... पहिल्या रात्री पत्नीचे कपडे काढायला त्रास होत होत म्हणून नवऱ्यानं तिला मारहाण केलीय. 

Updated: Feb 19, 2015, 02:56 PM IST
... म्हणून लग्नाच्या पहिल्या रात्रीच त्याची पत्नीला मारहाण title=

लंडन: नवरा-बायकोची भांडणं ही काही नवी नाहीत. मात्र लग्नाच्या पहिल्याच रात्री पत्नीला जबर मारहाण करणारा नवरा ना आपण कधी पाहिला असेल ना ऐकला असेल. या मारहाणीचं कारणही जरा विचित्रच आहे... पहिल्या रात्री पत्नीचे कपडे काढायला त्रास होत होत म्हणून नवऱ्यानं तिला मारहाण केलीय. 

ही गंमत नाही तर सत्य घटना आहे.  डेली मेलमधील बातमीनुसार इंग्लंडच्या एका हॉटेलमध्ये फर्स्ट नाइटदरम्यान हा प्रकार घडला. अखेर हॉटेल स्टाफनं त्या नववधूला वाचवलं. इंग्लंडच्या सनडरलँडमध्ये राहणाऱ्या गोलाइटली नावाच्या मुलाचं लग्न मिस डॉसन सोबत झालं होतं. पण आता या घटनेनंतर महिला आपल्या पतीला घटस्फोट देणार आहे. 

अशी घडली घटना -

पहिल्या रात्री डॉसनच्या नवऱ्यानं तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला त्यात अडचण येत होती. त्यानंतर अचानक तो भडकला आणि पहिले पत्नीला ढकललं आणि नंतर तिला मारहाण केली. 

डॉसनने सांगितलं तिला जेव्हा नवरा मारत होता, तेव्हा ती अर्धमेली झाली होती. तिनं गोलाइटलीला खूप विणवण्या केल्या पण तो थांबला नाही. तो एकदा खोलीबाहेर गेला तेव्हा जखमी डॉसनने बाहेर जाण्याचा प्रयत्न केला, पण तो परतला आणि पकडून पुन्हा मारायला लागला. त्यावेळी एका हॉटेल कर्माचाऱ्यानं अखेर पीडित डॉसनची सुटका केली. 

सध्या गोलाइटलीला अटक करण्यात आली असून कोर्टात याप्रकरणाची सुनावणी सुरू आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.