लंडन : ब्रिटनमध्ये एक धक्कादायक घटना समोर आलीय. एका २१ वर्षाच्या युवकाने गाढवासोबत सेक्स केल्याने त्याला शिक्षा सुनावण्यात आलीये. या युवकाने असे केल्याची कबुलीही कोर्टात दिलीय.
या युवकाला या प्रकरणी एक महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आलीये. सुरुवातीला कोर्टाने या युवकाला ४४३ डॉलरचा दंड ठोठावला होता. तसेच याला निगराणीखाली ठेवण्याचे आदेश दिले होते.
मात्र त्या युवकानेच आपल्याला कठोर शिक्षा द्यावी असे सांगितल्यानंतर त्याला एका महिन्याची शिक्षा सुनावण्यात आली.
हा २१ वर्षीय युवक क्लार्क काउंटीच्या शेतात काम करत होता. गेल्या वर्षी हा प्रकार घडला. या प्रकारानंतर पोलिसांनी या युवकाला अटक केली होती. शेताच्या मालकानेही या युवकाला कामावरुन काढून टाकलेय.