अजब गजब : डॉक्युमेंटरीसाठी तिनं केला आदिवासी तरुणाशी विवाह!

बॉलिवूडच्या एखाद्या सिनेमात घडावी अशी घटना इक्वॉडोरच्या अमेझॉन क्षेत्रातील बरसाती जंगलात घडलीय. इथं, एका फिल्ममेकर तरुणीनं चक्क एका आदिवासी तरुणाशी विवाह केलाय... तोही आपली डॉक्युमेंटरी पूर्ण करण्यासाठी...

Updated: Dec 18, 2014, 12:40 PM IST
अजब गजब : डॉक्युमेंटरीसाठी तिनं केला आदिवासी तरुणाशी विवाह! title=

नवी दिल्ली : बॉलिवूडच्या एखाद्या सिनेमात घडावी अशी घटना इक्वॉडोरच्या अमेझॉन क्षेत्रातील बरसाती जंगलात घडलीय. इथं, एका फिल्ममेकर तरुणीनं चक्क एका आदिवासी तरुणाशी विवाह केलाय... तोही आपली डॉक्युमेंटरी पूर्ण करण्यासाठी...

बरसाती जंगलात राहणाऱ्या हुवेयोरानी आदिवासी जमातीच्या परंपरा खूप कट्टर असल्याचं सांगण्यात येतं. त्यांची अशी मानणं आहे की, आपल्या जमातीबद्दल कुणाला काही सांगायचं असेल तर कबील्यातील कुणाशी तरी त्या व्यक्तीला लग्न करावा लागतो. 

नुकताच, असा प्रकार समोर आलाय. २४ वर्षांची ब्रिटिश फिल्ममेकर तरुणी साराह बेगम एक डॉक्युमेंटरी बनविण्यासाठी इथं दाखल झाली होती... माहिती मिळवण्यासाठी तिला याच कबिल्यातील गिनक्तो नावाच्या एका ३० वर्षीय तरुणाशी विवाह करावा लागलाय. 

साराहला आपल्या फिल्ममध्ये या आदिवासी लोकांच्या कामांच्या पद्धती तसंच तिथल्या संस्कृती आणि सभ्यतांचा अभ्यास करायचा होता. अनोळखी लोकांना काहीही सांगण्यास नकार देणाऱ्या या लोकांना पटवण्यासाठी तिनं या कबिल्यातील तरुणाशी लग्न केलं. अर्थातच, हे लग्न केवळ नावापुरतं होतं. 

पण, साराह काम करत असलेलं प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी तिनं जवळपास ५८०० मीलचा प्रवास पूर्ण केला. यावेळी, तिनं इथल्या आदिवासी लोकांशी संवाद साधला. तेव्हा इथल्या महिलांनी तिला आपल्या कामांचा शिवणकाम-जेवणाच्या पद्धतींची माहिती दिली. तर पुरुषांनी तिला शिकार करण्याच्या पद्धतीची माहिती दिली.

या कामासाठी साराह दोन आठवड्यांपर्यंत या जंगलात होती. तिच्यासाठी हे एक आव्हानच होतं, कारण तिची भाषा आणि आदिवासींची भाषा वेगळी होती... इथल्या केवळ एकाच व्यक्तीला स्पॅनिश भाषा येत होती. त्यानंच साराहला मदत केली.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.