मोगादिशू : मोगादिशू येथून जिबूती येथे जाणाऱ्या प्रवासी विमानात १४ हजार फुटांवर स्फोट झाल्याने एक घबराट पसरली. डेली मेलने दिलेल्या रिपोर्टनुसार, डैलो एअरलाइन्सची फ्लाइट क्रमांक D3159 मध्ये ७४ प्रवासी होते. विमान टेकऑफनंतर पाच मिनिटात एअरबस A321मध्ये धमाका झाला त्यामुळे विमानाला सहा फुटाचे भगधाड पडले.
या फटीतून पूर्णपणे जळालेला व्यक्ती बाहेर फेकला गेला. रिपोर्टनुसार धमाका झाला त्यावेळी विमान विमानतळापासून २४ किलोमीटर लांब आणि १४ हजार फुटांवर होते. या विमानात एका सुसाईड बॉम्बर घुसला होता. विमान टेकऑफनंतर पाचव्या मिनिटात स्फोट झाला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
विमानाला भगदाड पडल्यामुळे विमानात लो प्रेशर बनले होते त्यामुळे प्रवाशांना ऑक्सिजन मास्क घालावे लागले. त्यानंतर विमानाची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.
या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले असल्याचे एअरलाइन्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सोमालियाच्या इस्लामिक संघटना अल शबाबचा हा गड असून त्यांनीच हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.