नोम पेन्ह : कंबोडियाचे पंतप्रधान हुन सेन यांना बिना हेल्मेट बाईक चालविणे महागात पडले. वाहतूक नियम मोडल्याने त्यांना १५ हजार रियाल दंड भरावा लागला.
१८ जून रोजी कोंग प्रांतात हुन सेन हे बाईक चालवत होते. त्यावेळी त्यांनी हेल्मट परिधान केलेले नव्हते. कोंग प्रांताचे नियम त्यांनी मोडल्याने त्यांना १५ हजार रियाल (२५५ रुपये) दंड भरावा लागला.
वाहतूक नियम मोडल्याने दंड भरणाऱ्या या पंतप्रधानांनी सोशल मीडिया फेसबूकवर जाहीरपणे माफी मागितली. हुन सेन यांनी सांगितले की, माझा बाईक चालविण्याचा हेतू नव्हता. दौऱ्याच्यावेळी आपल्या कारमधून उतरल्यानंतर एक मोटर टॅक्सी चालकाजवळ ते गेले यावेळी बिना हेल्मेट गाडी चालवली.
त्यांना दंड ठोठवणाऱ्या पोलिसांचे त्यांनी खास अभिनंदनही केले.