ओटावा : वीजटंचाईला तोंड देत असलेल्या भारताला कॅनडा या वर्षापासूनच पाच वर्षे युरेनियमचा पुरवठा करणार आहे. याबाबात करार करण्यात आला आहे.
पंतप्रधान बुधवारी तीन दिवसीय कॅनडा दौऱ्यानिमित्त इथं दाखल झाले. भारताला युरेनियम पुरवठा करण्याचा कॅनडाचा हा निर्णय दोन देशांतील द्विपक्षीय सहकार्य आणि परस्परांमधील विश्वासाचा नवा अध्याय असल्याचं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.
कॅनडाचे पंतप्रधान स्टीफन हार्पर यांच्याशी मोदी यांनी व्यापक चर्चा केल्यानंतर करारावर स्वाक्षरी झाली. तीन हजार मेट्रीक टन युरेनियमसाठी २५४ दशलक्ष अमेरिकन डॉलरचा खर्च येणार आहे. . दरम्यान, कौशल्य विकास क्षेत्रात दोन्हीही देशांनी १३ करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.