लंडन : आफ्रिका खंडात असणाऱ्या मध्य आफ्रिकी प्रजासत्ताक या देशातून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या देशात तैनात असणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघ (युनायटेड नेशन) शांती रक्षरक सेनेच्या सैनिकांनी येथील शेकडो महिलांवर आणि मुलींवर अनन्वित अत्याचार केल्याची माहिती पुढे आली आहे. चक्क कुत्र्यासोबत सेक्स करायला भाग पाडले.
गेली काही वर्ष हे सैनिक येथील महिलांवर अत्याचार करत असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये येत होता. त्याची सत्यता तपासण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने एक पथक या देशात पाठवले होते. तेव्हा महिलांशी बोलताना १०८ महिलांनी येथील शांतता पथकातील आणि फ्रान्सचे सैनिक आपले लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप या पथकासमोर केला. तसेच त्यांनी कुत्र्यासोबत सेक्स करायला लावला.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या फौजांवर झालेल्या आरोपांमुळे राष्ट्रसंघाचे प्रमुख बान की मून हे पुरते हादरुन गेले आहेत. यातील काही सैनिकांनी तर अल्पवयीन मुलींना थोडे पैसे चारुन त्यांना स्थानिक कुत्र्यांसोबत सेक्स करण्यास भाग पाडल्याचा आरोपही काही महिलांनी केला आहे. हा धक्कादायक आरोप ऐकून जगभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
लैंगिक शोषणाच्या घटनांवर नजर ठेवणाऱ्या 'एड्स फ्री सोसायटी' या संस्थेने याप्रकरणी सर्वेक्षण केले आहे. त्यांना एका मुलीने दिलेल्या माहितीनुसार येथील एका अल्पवयीन मुलीचे काही फ्रेंच सैनिकांनी अपहरण करुन तिला निर्वस्त्र केले. त्यानंतर तिच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले.
या आणि अशाप्रकारच्या आरोपांमुळे संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. लोकांचे रक्षकच त्यांचे भक्षण करत असल्याने आता जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे.