www.24taas.com, झी मीडिया, बीजिंग
चीनच्या मंत्रिमंडळानं शनिवारी संमत केलेल्या प्रस्तावामुळे, आता चीनमधील ज्या जोडप्यांना केवळ एकच अपत्य आहे अशा जोडप्यांना दोन मुलांना जन्म देण्याची परवानगी प्रदान करण्यात आलीय.
समाचार एजन्सी सिन्हुआनं दिलेल्या माहितीप्रमाणे ‘नॅशनल पीपल्स काँग्रेस’च्या (एनसीपी) स्थायी समितीनं आपल्या द्विमासिक सत्रात परिवार नियोजन योजनेमध्ये सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिलीय. नव्या योजनेचा प्रस्ताव पुनर्विचारासाठी चीनमधल्या प्रांतीय काँग्रेस आणि त्यांच्या स्थायी समितींकडे सोपवण्यात आलाय.
चीन कम्युनिस्ट पार्टी (सीपीसी)नं १८ व्या सीपीसी सेंट्रल कमिटीच्या तिसऱ्या पूर्ण अधिवेशनात ‘एक अपत्य योजने’त सुधारणा करण्याचा निर्णय घेतला होता.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.