आंतरराष्ट्रीय १० बातम्या एका क्लिकवर

Reuters | Updated: Aug 11, 2015, 04:15 PM IST
आंतरराष्ट्रीय १० बातम्या एका क्लिकवर title=

अमेरिका इसिसवर करणार हल्ल्या

न्यूयॉर्क : इसिसवर हल्ल्याकरिता अमेरिकेने तुर्कीमध्ये एफ सिक्स्टीन विमानं तैनात केली आहे. आतापर्यंत बॉम्बहल्ल्यात केवळ 6 विमानांचाच उपयोग करण्यात आला आहे.

महिलेचा हात खाल्ला
अमेरिकेत मगरीनं महिलेवर हल्ला करत तिचा हात खाल्ला. ही घटना अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये घडली आहे. वेकिया नदीत ही महिला पोहत होती. त्यावेळी ही दुर्घटना घडली. 

कृष्णवर्णीय मुलावर गोळी घातली
कृष्णवर्णीय मुलावर गोळी झाडल्याप्रकरणीचा तपास एफबीआयकडे सोपवण्यात आला आहे. टेक्सासमध्ये या मुलावर एका शोरूममध्ये कार घुसवल्याचा आरोप होता. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसाने त्या मुलावर गोळी झाडली. 

चिलीमध्ये वादळी पाऊस आणि पूर
चिलीमध्ये आलेल्या वादळी पावसात 3 लोकांचा मृत्यू झाला. उत्तर किनारी प्रदेशात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक घरंही उद्धवस्त झाली असून, मच्छिमारांचही नुकसान झालं आहे. 

चीनमध्ये सॉडेलॉर वादळ
चीनमध्ये आलेल्या सॉडेलॉर वादळात आतापर्यंत 8 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर पावसामुळे झेझियांग प्रांतात पूरपरस्थिती निर्माण झाली आहे. वादळी पावसामुळे काही भागातील वीजही गुल झाली आहे. 

इंग्लंडमध्ये मूवर्स रेस
इंग्लंडमध्ये लॉन मूवर्स रेस पार पडली. या स्पर्धेची लोकप्रियता वाढत चालली आहे. ससेक्समध्ये झालेल्या या रेसमध्ये यावेळी 37 टीम्स सहभागी झाल्या होत्या. 

रशियात मास्टर ऑफ एअर डिफेंस बॅटल 
रशियात मास्टर ऑफ एअर डिफेंस बॅटल 2015 स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत नाटोचा एकही सदस्य नव्हता. या स्पर्धेत एँटी एअरक्राफ्ट बंदुकांसह शोल्डर फायर मिसाईल्सचाही सहभाग होता. 

सिंगापूरला स्वातंत्र्य परेड 
सिंगापूरला स्वातंत्र्य मिळून 50 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याकरता एका विशेष परेडचंही आयोजन करण्यात आलं. या परेडदरम्यान आकर्षक रोषणाईसह फायटर जेट्सनेही कवायती केल्या. मलेशियाला 1965 मध्ये स्वातंत्र्य मिळालं होतं. 

इसिसविरूद्ध हल्ला
सीरियन सैन्याने हसकाह शहरात इसिसविरूद्ध हल्ल्यादरम्यान मोठ्या संख्येत हत्यार आणि गुप्त माहिती मिळवली आहे. इसिसचे दहशतवादी कॅप्टागॉन नावाचं औषध खाऊन लढत असल्याची माहिती समोर आली आहे. 

बायकिंग चॅम्पियनशीप स्पर्धा

ऑस्ट्रियामध्ये माऊंटन बायकिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत ब्रिटन, स्वीडन, जर्मनी, अमेरिका आणि कॅनडा देशाच्या ५० हून अधिक बायकर्स सहभागी झाले होते. दीड किलोमीटर लांबीच्या या स्पर्धेकरता चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.