मॉस्को : मॉस्को शहरात धावत्या कारमध्ये एका जोडप्याने सेक्स केल्याचा विचित्र प्रकार घडलाय. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
बीएमडब्लू एक्स६ कार वर्दळीच्या रस्त्यावर वेगाने धावत होती. या गाडीत एक तरुण जोडपं होत. गाडी चालू असताना ती दोघं सेक्स करत होती. दरम्यान या दाम्पत्याला गाडी चालवाताना सेक्स करत असल्याचे दुसऱ्या ड्रायव्हरने पाहिले आणि त्याने व्हिडीओ बनवला.
या घटनेतील पुरुष २९ वर्षाचा असून महिला ३० वर्षांची आहे. हे दोघेही मित्र आहेत. याप्रकरणी ते व्हिडीओ फुटेज तपासण्यात येणार असून त्यात ते सेक्स करताना आढळल्यास त्यांना ५०० रुबेल दंड होऊ शकतो, असे पोलिसांनी सांगितले.