close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

न्यायाधीशाचा बलात्कार पीडित महिलेला धक्कादायक प्रश्न

बलात्कार झालेल्या पीडितेला न्यायालयाच्या न्यायाधीशांनी एक असा प्रश्न केला की सगळ्यांनीच बोट तोंडात घातले असतील.

Updated: Mar 12, 2016, 12:30 PM IST
न्यायाधीशाचा बलात्कार पीडित महिलेला धक्कादायक प्रश्न

मॅडरिड : बलात्कार झालेल्या पीडितेला न्यायालयाच्या न्यायाधीशांनी एक असा प्रश्न केला की सगळ्यांनीच बोट तोंडात घातले असतील.

स्पॅनिश न्यायाधीशाने बलात्कार पीडितेला विचारलेल्या प्रश्नावर सध्या स्पेनमध्ये वादळ उठलं आहे. सामाजिक संस्थानी याचा जोरदार विरोध केला आहे.

मागच्या महिन्यात गर्भवती असलेल्या या महिलेने तिच्यावर लैगिंक अत्याचार आणि बलात्कार झाल्याची पोलिसात तक्रार दिली होती. त्यानंतर न्यायालयात न्याय मिळावा या अपेक्षेने ती न्यायालयात गेली पण न्यायाधीशांच्या एका प्रश्नामुळे तिला मनस्ताप झाला असेल.

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार न्यायाधीशाने त्या महिलेला विचारलं की, बलात्कारावेळी तु तुझे पाय जवळ घेऊन बंद केले होते का? तु तुझी योनी झाकण्याचा प्रयत्न केला होता का ?