देवयानी खोब्रागडे यांना राजनैतिक संरक्षण नाही - अमेरिका

भारताच्या राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकी कायद्यानुसार कुठलेही राजनैतिक संरक्षण नसून त्यांच्यावरील खटला चालूच राहणार आहे, असे मॅनहॅटनच्या सरकारी वकिलांनी शुक्रवारी न्यायालयामध्ये सांगितले. गेल्या डिसेंबरमध्ये खोब्रागडे यांना व्हिसा गैरव्यवहार प्रकरणी अमेरिकी पोलिसांनी अटक केल्यापासून दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 1, 2014, 07:07 PM IST

www.24taas.com , वृत्तसंस्था, न्यूयॉर्क
भारताच्या राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना अमेरिकी कायद्यानुसार कुठलेही राजनैतिक संरक्षण नसून त्यांच्यावरील खटला चालूच राहणार आहे, असे मॅनहॅटनच्या सरकारी वकिलांनी शुक्रवारी न्यायालयामध्ये सांगितले.
गेल्या डिसेंबरमध्ये खोब्रागडे यांना व्हिसा गैरव्यवहार प्रकरणी अमेरिकी पोलिसांनी अटक केल्यापासून दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. देवयानी यांना १२ डिसेंबर रोजी अटक झाली होती. त्यावेळी त्यांचे पद राजनैतिक अधिकारी हेच असल्याने आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार त्यांना केवळ अधिकृत सरकारी कामांसाठीच राजनैतिक संरक्षण मिळू शकते, अशी भूमिका मॅनहॅटनचे सरकारी वकिलांनी घेतली आहे.
देवयानी प्रकरणी भारत अमेरिका यांच्यातील तणाव कायम आहेत. त्यामुळे देवयानी यांनी भारत परतण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्या भारतात आहेत. या प्रकरणात पेच निर्माण झाल्यानंतर भारताने देवयानी यांची बदली संयुक्त राष्ट्रसंघातील भारतीय सेवेमध्ये केली.
या घडामोडींनंतर १४ जानेवारी रोजी देवयानी भारतामध्ये परतल्या. देवयानी यांच्यावरील खटला रद्द करावा, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी न्यूयॉर्कच्या न्यायालयामध्ये केली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.