ढाका : बांग्लादेशाची राजधानी ढाका अतिरेकी हल्ल्याने हादरली. ६० ओलीस ठवलेल्या नागरिकांची ढाक्यातील पोलिसांनी १३ ओलिसांची सुटका केली आहे. तर पाच अतिरेक्यांना मारण्यात यश आले असून एका अतिरेक्याला जिवंत पकडले आहे. तर ३६ जखमींवर उपचार सुरु आहे.
ओलीस ठेवण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जपानी आणि भारतीयांचा समावेश आहे. बांग्लादेशातल्या ढाका इथल्या डिप्लोमॅटीक क्वार्टरच्या उपहारगृहात ५ ते ९ बंदूकधारी हल्लेखोरांनी हल्ला केला. गुलशन प्रांतातील या उपहारगृहात हल्लेखोरांनी २० नागरिकांना ओलीस ठेवले. तर ३ बॉम्ब निकामी करण्यात पोलिसांना यश आले. त्यामुळे मोठी जिवीत वित्तहानी टळली आहे.
दहशतवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या गोळीबारात २ जण ठार झालेत तर १५ जण जखमी झालेत. दहशतवादी संघटना इसिसने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. रात्री नऊच्या सुमारास डिप्लोमॅटिक क्वार्टरच्या उपहारगृहाच्या बाहेर गोळीबारास सुरुवात झाली. दरम्यान ढाका इथले सर्व भारतीय सुरक्षित आहेत अशी माहिती भारतीय उच्चायुक्तांनी दिली आहे.