शनी, गुरू या ग्रहांवर हिऱ्यांचा पाऊस

तुम्ही गारांचा पाऊस, अॅसिड रेन, लाल पाऊस, पिवळा पाऊस पाहिला असेल किंवा ऐकला असेल. मात्र, आता ग्रहांवर पाऊस पडणार आहे. तोही गारांचा नाही तर चक्क हिऱ्यांचा असणार आहे. हिऱ्यांच्या पावसाचा दावा अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी केला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 15, 2013, 02:58 PM IST

www.24taas.com, वॉशिंग्टन, वृत्तसंस्था
तुम्ही गारांचा पाऊस, अॅसिड रेन, लाल पाऊस, पिवळा पाऊस पाहिला असेल किंवा ऐकला असेल. मात्र, आता ग्रहांवर पाऊस पडणार आहे. तोही गारांचा नाही तर चक्क हिऱ्यांचा असणार आहे. हिऱ्यांच्या पावसाचा दावा अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी केला आहे.
शनी आणि गुरू या ग्रहांवर हिऱ्यांचा पाऊस कोसळ, असे अमेरिकेच्या शास्त्रज्ञांना वाटत आहे. या ग्रहांवरील विशिष्ट वातावरणामुळे तेथे सुमारे एक सेंटिमीटर आकाराच्या हिऱ्यांचा पाऊस पडेल, असा अंदाज अमेरिकेन शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

ग्रहांवरील वातावरणात स्फटिक स्वरूपात असलेल्या कार्बनचे मोठे प्रमाण आढळून आले आहे. त्यामुळे असा पाऊस पडण्याची शक्‍यता असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. जोरदार वादळासह पडणाऱ्या विजांमुळे गुरू आणि शनी या वायूपासून बनलेल्या ग्रहांवरील वातावरणातील मिथेनचे कार्बनमध्ये रूपांतर होईल.
खाली कोसळताना दाब वाढल्याने कार्बन कठीण होत जाऊन त्याचे आधी ग्रॅफाईट आणि नंतर हिऱ्यात रूपांतर होईल, असे विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. केविन बायन्स यांचे म्हणणे आहे. मात्र, पावसाच्या माध्यमातून पडणारे सर्व हिरे या ग्रहांच्या गर्भात असणाऱ्या उकळत्या लाव्हांमध्ये वितळून जातील, असेही ते म्हणालेत.
शनी ग्रहावर एका वर्षात किमान एक हजार टन हिरे पडतील. आपण तेथे जाऊन हे पडताळून पाहू शकत नसल्याने हा अंदाजच आहे. आम्ही केलेल्या अभ्यासानुसार असे घडण्याची शक्‍यता दाट आहे, असे बायन्स यांनी म्हटले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.