धक्कादायक : पठाणकोट हल्ल्याची शरीफांना पूर्वकल्पना होती?

पठाणकोट दहशतवादी हल्ल्यानंतर एक धक्कादायक खुलासा समोर आलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे सेना प्रमुख राहील शरीफ यांना या दहशतवादी हल्याची कल्पना अगोदरपासून होती, असं आता समोर येतंय. 

Updated: Jan 5, 2016, 02:02 PM IST
धक्कादायक : पठाणकोट हल्ल्याची शरीफांना पूर्वकल्पना होती? title=
नवाझ शरीफ आणि राहील शरीफ

इस्लामाबाद : पठाणकोट दहशतवादी हल्ल्यानंतर एक धक्कादायक खुलासा समोर आलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे सेना प्रमुख राहील शरीफ यांना या दहशतवादी हल्याची कल्पना अगोदरपासून होती, असं आता समोर येतंय. 

मिळालेल्या माहितीनुसार, सीमेपलिकडून भारताविरुद्ध दहशतवादी कारवाया रचणारे काही दहशतवादी भारतात घुसलेत, याची पूर्वकल्पना राहील शरीफ यांना होती. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आणि भारतभेटीनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी दहशतवादाविरुद्ध पावले उचलण्याचा निर्णय घेतलाय. परंतु, सेनाप्रमुखांकडून मात्र त्यांना हवा तसा प्रतिसाद नसल्याचं सांगण्यात येतंय. 

यामुळे, भारत-पाक दरम्यान संबंध सुरळीत व्हावेत, अशी पाकिस्तान सेनेची इच्छा नसल्याचंच उघड होतंय. 

दरम्यान, पठाणकोटवर हल्ला करणारे दहशतावादी पाकिस्तानातून आले असल्याचं आता समोर येतंय. सोमवारी रात्री उशीरा पाक परराष्ट्रमंत्रालयाच्या एका प्रवक्त्यानं 'आम्ही शहीद झालेल्या कुटुंबीयांचं दु:ख समजू शकतो. पाकिस्तान स्वत:ही दहशतवाद पीडित देश आहे' असं वक्तव्य केलं.