www.24taas.com
मलायाच्या सुदूर जंगलीत वास्तव्य करणाऱ्या आदिवासींमध्ये घटस्फोट घेण्याची विचित्र परंपरा आहे. एखाद्याला स्वत:च्या पत्नीला घटस्फोट घ्यायचा असेल तर, त्याला आपल्या संपूर्ण समुहातील लोकांना निमंत्रित करावे लागते. त्यांना सगळ्यांना जेवण द्यावे लागत असते. या कार्यक्रमादरम्यान संबंधित व्यक्ती त्याच्या पत्नीला विवस्त्र करतो. संपूर्ण कार्यक्रमात ती विवस्त्र असते.
या दरम्यान जर अन्य कोणाला तिच्यासोबत लग्न करायचे असेल तर तो व्यक्ती तिला वस्त्र देत असतो. जगाच्या पाठीवरील विविध भागात आदिवासी जनजमाती विखुरल्या आहेत. आदिवासींमध्ये होणारे विवाह हे जगावेगळेच असतात. त्याचप्रमाणे आदिवासींमध्ये घटस्फोट घेण्याच्याही विचित्र परंपरा आहेत. जगातील अतिदुर्गम भागात राहणारे आदिवासी आजही मागासलेले आहे.
विशेष म्हणजे ते कधी मुख्य प्रवाहातही आलेले नाहीत. त्यामुळे आदिवासी समाज धावत्या जगापासून फारच मागे राहिलेला आहे. सुख-सुविधा तर दूरच परंतु या लोकांना अजून त्यांचे मुलभूत अधिकारही कळलेले नाहीत. लग्न जुळण्यापासून तर फारकत घेण्यापर्यंत आदिवासी समाजातील महिलांना विवित्र परिस्थितीचा सामना करावा लागतो.