इस्लामाबाद : पाकिस्तानच्या कुर्रम कबाइली जिल्ह्यात एक तरुणीच्या पोटातून चक्क धातूचे तुकडे आणि नखे मिळालीत.
पोटातून बाहेर काढण्यात आलेल्या वस्तू पाहून शस्त्रक्रिया करणारे डॉक्टरही चकित झाले. तब्बल 4 तास ही शस्त्रक्रिया सुरु होती.
तरुणीच्या पोटात दुखत असल्याने डॉक्टरांनी पोटाचा एक्सरे काढला. त्यावेळी पोटात काही तरी असल्याच समजलं होतं. त्यामुळे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय़ घेतला. शस्त्रक्रियेनंतर आता तरुणीची परिस्थिती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.