असंही घडू शकतं... एका कुत्रीनं चिमुरड्याला दूध पाजून जगवलं

एका आईनं आपल्या दोन वर्षांच्या मुलाला उपाशी सोडून दिलं आणि स्वत: दारूच्या नशेत पडून राहिली. त्या मुलाला पाहून माणसांना नाही तर एका कुत्रीला दया आली. एका कुत्रीनं आपलं दूध पाजून चिमुरड्याला जिवंत ठेवलं.

Updated: Sep 6, 2015, 11:50 AM IST
असंही घडू शकतं... एका कुत्रीनं चिमुरड्याला दूध पाजून जगवलं title=

चिली: एका आईनं आपल्या दोन वर्षांच्या मुलाला उपाशी सोडून दिलं आणि स्वत: दारूच्या नशेत पडून राहिली. त्या मुलाला पाहून माणसांना नाही तर एका कुत्रीला दया आली. एका कुत्रीनं आपलं दूध पाजून चिमुरड्याला जिवंत ठेवलं.

एका इंग्रजी वेबसाइटनुसार मुलाची ओळख पटली नाहीय. मात्र त्याला शेजारच्या कुत्रीचं दूध पितांना पाहिलं गेलंय. त्याची आई त्यावेळी दारूच्या नशेत होती आणि तिनं मुलाला सोडून दिलं होतं. घटना पाहिल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना कळवलं. त्यानंतर मुलाला सेंटियागोच्या हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आलं.

तपासात मुलगा कुपोषित असल्याचं दिसून आलं त्याला स्कीन इंन्फेक्शनही झालेलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका मॅकॅनिकच्या वर्कशॉपमध्ये कुत्रीचं दूध पिणाारा हा मुलगा गरीब भागातला आहे. पोलीस अधिकारी गजार्डोने यांनी सांगितलं की, मुलाला पाहून त्याला बेवारस सोडून दिल्याचं कळतंय. तो उपाशी होता आणि कुत्री त्याला दूध पाजतेय, हे तिथून जाणाऱ्या अनेकांनी पाहिलं.

त्याची आई नशेत पडली होती तर वडील खूप उशीरा दवाखान्यात पोहोचले. मुलाला नंतर हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात आली आणि त्याला चाईल्ड केअरला पाठवलं गेलंय. संपूर्ण प्रकरणात मुलाच्या आईला अटक करण्यात आली नाही. पण अल्पवयीनांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेनं कोर्टात अर्ज दाखल केला. २२ सप्टेंबरला सुनावणीनंतर हा चिमुरडा कुणाजवळ राहिल याचा निर्णय होईल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.