डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवे अध्यक्ष, हिलरी क्लिंटन यांचा पराभव

संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारलीये. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवे अध्यक्ष बनलेत. त्यांना २७६ इलेक्टोरल व्होट मिळालेत. 

Updated: Nov 9, 2016, 01:35 PM IST
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवे अध्यक्ष, हिलरी क्लिंटन यांचा पराभव title=

न्यूयॉर्क : संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी बाजी मारलीये. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवे अध्यक्ष बनलेत. त्यांना २७६ इलेक्टोरल व्होट मिळालेत. 

डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांच्या काँटे की टक्कर रंगली होती. या अतिमहत्त्वपूर्ण लढतीत डेमोक्रेटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांचा पराभव झालाय. क्लिंटन यांना २१८ इलेक्टोरल व्होट मिळालेत. 

ट्रम्प हे अमेरिकेचे ४५वे अध्यक्ष आहेत. अधिकृत घोषणा झाल्यानंतर हिलरींनी ट्रम्प यांचे कौतुक केले. तब्बल ८ वर्षांनी रिपब्लिक पक्ष पुन्हा सत्तेत आलाय.