डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत दिला पंतप्रधान मोदींचा नारा

अमेरिकेच्या राष्‍ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला आता काही दिवस उरले आहेत. अशातच रिपब्लिकन पक्षाचे उम्‍मेदवार डोनाल्‍ड ट्रम्‍प आणि डेमोक्रेटिक उम्‍मेदवार हिलेरी क्लिंटन मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेत भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे भारतीय मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न होतो आहे.

Updated: Oct 26, 2016, 08:47 AM IST
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत दिला पंतप्रधान मोदींचा नारा title=

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्‍ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला आता काही दिवस उरले आहेत. अशातच रिपब्लिकन पक्षाचे उम्‍मेदवार डोनाल्‍ड ट्रम्‍प आणि डेमोक्रेटिक उम्‍मेदवार हिलेरी क्लिंटन मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेत भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे भारतीय मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न होतो आहे.

ट्रम्‍प यांनी भारतीय लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी पंतप्रधानांचा नारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४ मध्ये 'अबकी बार मोदी सरकार'चा नारा दिला होता. तसचं काही ट्रम्प करत आहेत. त्यांनी अबकी बार ट्रम्प सरकारचा नारा दिला आहे.

अमेरिकेसाठी भारत-अमेरिका संबंध महान आहेत. असं देखील त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी केलेल्या एका जाहिरातीत 'रिपब्लिकन हिं‍दू कोअलिशन' नावाच्या संस्थेचा हात आहे. या समुहाने न्‍यू जर्सीमध्ये ट्रम्‍प यांच्यासोबत बैठकीचं आयोजन केलं होतं. दिवाळीच्या शुभेच्छा देत ट्रम्प यांनी बोलायला सुरुवात केली. 

पाहा काय बोलले ट्रम्प

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर ट्रम्प यांनी दावा केला आहे. हिलेरी क्लिंटन या अधिक राज्यांमध्ये ७ अंकांनी पुढे आहे. तरी ८ नोव्हेंबरला आपणच जिंकू असा विश्वास ट्रम्प यांनी बोलून दाखवला आहे.