व्हिएन्ना : ऑस्ट्रियातील पूर्व बर्जनलँड प्रांतात एका ट्रकमधून सुमारे २० मृतदेह सापडले आहे. स्थालांतरीत व्यक्तींचे हे मृतदेह असण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मृतदेहांची संख्या ५० च्या आसपास असण्याची शक्यता आहे. हा ट्रक हंगेरीच्या सीमावर्ती भागातील मुख्य मार्गावर सापडली. हायवेवर हा ट्रक थांबल्यानंतर उग्रवास येऊ लागला त्यानंतर ही घटना उघडकीस आली.
हा ट्रक फ्रिजर ट्रक असून त्यातून मृतदेह सापडणे हा खूप मोठा अपराध असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
मानव तस्करी आणि स्थालांतरीतांचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकार त्वरीत कारवाई करणार असल्याचे ऑस्ट्रियाचा गृहमंत्र्याने सांगितले.
Just drove past truck on A4 in Austria with 50 dead refugees inside. Terrible smell of death as we passed. pic.twitter.com/a2AiDnsy5V
— Lindsey Hilsum (@lindseyhilsum) August 27, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.