वेंकूवर : 'सेल्फी'ची क्रेज अख्ख्या जगभरात सुरू आहे. या 'सेल्फी'चं वेड माणसांना तर लागलेलंच आहे... पण, आता तर प्राणीदेखील 'सेल्फी' काढताना दिसत आहेत.
नुकताच, एका हत्तीचा 'सेल्फी' सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. या सेल्फीला 'एल्फी' असं म्हटलं जातंय.
'ग्लोबल न्यूज डॉट सीए'च्या माहितीनुसार सोशल नेटवर्किंग साईट या हत्तीच्या 'एल्फी'चा ट्रेंड करत आहे. 'युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटीश कोलंबिया'चे माजी विद्यार्थी क्लिस्टिन लेब्लॅंक यांनी पहिल्यांदा हा फोटो पोस्ट केला होता. ही 'एल्फी' दक्षिण पूर्व थायलंडच्या कोह फांगान बेटावर काढली गेलीय.
'लेब्लॅंकने ग्लोबल न्यूज डॉट सीए'ला दिलेल्या माहितीनुसार, मी फोटो काढत होतो आणि हत्तीला केळीही भरवत होतो. जेव्हा माझ्याकडील केळी संपल्या त्यावेळी हत्तीने माझा कॅमेरा खेचून घेतला. कॅमेरा 'टाईम' सेटिंगवर होता. यानंतर लागोपाठ हत्तीने अनेक सेल्फी काढले. लेब्लॅंकने हे फोटोज् इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
काळ्या मॅकाकने अशीच एक सेल्फी मागील वर्षी इंडोनेशियाच्या द्वीवर सुलावेसीमध्ये काढली होती. या सेल्फीवरुन विकिपीडिया आणि फोटोग्राफर यांच्यात वाददेखील झाला होता. दोघेही या सेल्फीवर आपला अधिकार असल्याचा दावा करत होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.