www.24taas.com, झी मीडिया, वॉशिंग्टन
प्रसिद्धी आणि पैशासाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही... मग, हे वेड कुठल्या थराला घेऊन जाईल, याची ना चिंता ना फिकीर... अमेरिकेतील एका मेडिकलच्या विद्यार्थीनीच्या डोक्यात सध्या काहीसं असंच भूत शिरलंय. तिनं आपलं कौमार्यचं विक्रिला ठेवलंय. आपल्या कौमार्याचा ऑनलाईन लिलावच या विद्यार्थीनीनं जाहीर केलाय.
एक एप्रिलपासून ही विद्यार्थीनी आपल्या व्हर्जिनिटी म्हणजेच कौमार्याचा लिलाव सुरू करणार आहे. यासाठी तिनं आपला एक ब्लॉगही सुरू केलाय.
२७ वर्षीय एलिजाबेथ रेने या विद्यार्थीनीला पूर्ण खात्री आहे की आपलं कौमार्य विकून ती कमीत कमी ४००,००० डॉलर म्हणजेच तीन करोड रुपये तर नक्कीच कमाऊ शकेल.
एलिजाबेथच्या म्हणण्यानुसार, आपल्या कौमार्याविषयी तिला कोणताही भावनात्मक ओढ नाही... त्यामुळेच आपल्या हा लिलाव मांडताना तिला कोहीही वावगं वाटत नाही. यापद्धतीनंही खूप सारे पैसे कमावले जाऊ शकतात, मग हा उपाय अंवलंबविला तर त्यात गैर काय? असं तिचं म्हणणं आहे. अमेरिकेत वेश्यावृत्तीवर कडक प्रतिबंध असलयानं तिनं कायदेशीर मार्गानं जात आपल्या कौमार्याचा लिलाव करण्याची घोषणा केलीय. यासाठी तिनं ऑस्ट्रेलियाचा एक एजंटही शोधून काढलाय.
एलिजाबेथच्या म्हणण्यानुसार, आपलं कौमार्य विकण्याच्या निर्णयावर तिच्या कुटुंबीयांना आणि मित्र-मैत्रिणींना काहीही आक्षेप नाही... केवळ तिच्या भावाला तिचा हा निर्णय आवडलेला नाही. एलिजाबेथच्या वेबसाईटवर वापरण्यात आलेल्या प्रत्येक फोटोत तिचा चेहरा लपवण्यात आलाय. यावर तिनं आपल्या मेडिकल कॉलेजच्या नावाचाही उल्लेख केलेला नाही.
एलिजाबेथच्या म्हणण्यानुसार, ऑनलाईन लिलावाद्वारे जास्तीत जास्त बोली लावणाऱ्या व्यक्तीला तिच्यासोबत एका लग्झरी हॉटेलमध्ये १२ तास व्यतीत करण्याची संधी मिळेल. हे १२ तास ती केवळ सेक्ससाठी वापरणाचा तिचा निर्धार आहे. तिच्या दाव्यानुसार, आत्तापर्यंत कुणीही तिला नग्नावस्थेत पाहिलेलं नाही. ही संधी त्यालाच मिळेल जो लिलावात जास्तीत जास्त किंमत मोजेल.
फोटो साभार - (elizabeth-raine.com)
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.