वर्जिनिया : अजब मागण्या आणि त्यांचे गजब समाधान... एक बाप आपल्या लाडक्या मुलीच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कोणत्या सीमारेषा पार करू शकतो, याचं हे अजब उदाहरणच नुकतंच समोर आलंय.
अमेरिकेच्या वर्जिनियामध्ये राहणाऱ्या अरबपती जेरेमी हेटन याच्या मुलीची – एमिलीनं आपल्या बापाकडे ‘राजकुमारी’ बनण्याची इच्छा व्यक्त केली. मग काय, बापानं आपल्या मुलीची ही अजब मागणी पूर्ण करण्यात कोणतीच कसर बाकी ठेवली नाही.
एमिलीच्या पित्यानं – जेरेमी हेटननं आपल्या मुलीची इच्छा पूर्ण करण्याचा कसोशीनं प्रयत्न करण्यास सुरूवात केली, यासाठी, त्यानं आपल्या मुलीसाठी नवा देश खरेदी करण्याची आणि तिला तिथली राणी बनविण्याची घोषणा केली.
त्याच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळालं आणि त्यानं आफ्रिकेतील मिस्त्र आणि सूडानच्या मध्येच असलेलं 2000 वर्ग किलोमीटरचं एक उजाड बेट असलेल्या ‘बीर तवील’ खरेदी केलं.
त्यानंतर त्यानं आपला स्वत:चा एक नवा झेंडा फडकावून या भागाचं ‘उत्तर सूडान’ असं नामकरण केलंय आणि आपल्या मुलीला ‘उत्तरी सूडान’ची ‘प्रिन्सेस’ म्हणजेच राजकुमारी म्हणून घोषित केलंय. महत्त्वाचं म्हणजे, आपल्या राज्याचा हा नवा झेंडादेखील जेरेमीच्या लाडक्या मुलीनंच तयार केलाय.
संयुक्त राष्ट्र किंवा इतर कोणत्याही आंतरराष्ट्रीय संस्थांनी मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.