नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये राहणारी मूकबधीर मुलगी गीता लवकरच भारतात परतणार आहे, गीता दहा वर्षांआधी नकळतपणे सीमापार करून पाकिस्तानात आली होती.
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलंय की, गीता लवकरच भारतात परतणार आहे, आम्ही गीताचं परिवार शोधून काढलं आहे. डीएनएची तपासणी केल्यानंतर गीताला तिच्या परिवाराकडे सोपवलं जाणार आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गीताने आपले वडील, आपली सावत्र आई आणि आपल्या परिवाराला फोटोतून ओळखलं आहे. इस्लामाबादमधील भारतीय उच्चआयोगामार्फत हे फोटो पाठवण्यात आले होते. सुत्रांच्या माहितीनुसार गीताचं परिवार बिहारमध्ये राहत, २ ऑक्टोबररोजी फोटो पाहून गीताने आपलं परिवार ओळखलं होतं.
असं म्हटलं जातं की, गीता लहानपणापासून सीमा पारकरून पाकिस्तानच्या भूभागात दाखल झाली होती. बातम्यांमधील माहितीनुसार १५ वर्षांआधी लाहौर स्टेशनवर ती पाकिस्तानच्या रेंजर्सना सापडली होती. तेव्हा गीताचं वय सात ते आठ वर्ष होतं.
सध्या ती सामाजिक संस्था ईदी फाऊंडेशनच्या संरक्षणात आहे. पंजाब, बिहार, झारखंड आणि उत्तरप्रदेशमधील चार कुटुंबांनी दावा केला होता की, गीता त्यांची मुलगी आहे, मात्र आता गीताने तिच्या परिवाराला ओळखलं आहे.
बजरंगी भाईजान
सलमान खानची मुख्य भूमिका असलेल्या बजरंगी भाईजान या चित्रपटानंतर हा विषय चर्चेत आला, आणि गीता अखेर आपल्या घरी पोहोचणार आहे. बजरंगी भाईजान चित्रपटात एक पाकिस्तानची मुलगी भारतात हरवते, अखेर न बोलता येणाऱ्या या मुलीला सलमान म्हणजेच बजरंगी तिच्या घरी पाकिस्तानात पोहोचवतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.