दुबईत 'दी अॅड्रेस डॉऊनटाऊन' इमारतीला भीषण आग

जगभर नववर्ष स्वागताचा उत्साह सुरु असताना, दुबईत मात्र या उत्साहाला दुर्घटनेचं गालबोट लागलं आहे. 

Updated: Jan 1, 2016, 08:54 AM IST
 दुबईत 'दी अॅड्रेस डॉऊनटाऊन' इमारतीला भीषण आग title=

दुबई : जगभर नववर्ष स्वागताचा उत्साह सुरु असताना, दुबईत मात्र या उत्साहाला दुर्घटनेचं गालबोट लागलं आहे. 

जगप्रसिद्ध बुर्ज खलिफा हॉटेलच्या शेजारीच द एड्रेस हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये नववर्ष स्वागताचा जल्लोष सुरु होता. मात्र त्याचवेळी या हॉटेलच्या उंच इमारतीला आग लागली. 

थोड्याच वेळात या आगीनं संपूर्ण इमारतीला वेढलं. एक हजार फूट उंचीच्या या इमारतीचे 20 मजले आगीत जळून खाक झाले. या दुर्घटनेत जिवीतहानी झाली नसल्याची माहिती आहे. दरम्यान, पहाटेपर्यंत आग नियंत्रणात आणण्याचे काम सुरु होते.