नवी दिल्ली : काश्मीर सीमेवर पाकिस्तानकडून गुरुवारी रात्री उशीरा गोळीबार करण्यात आलाय.
विनाकारण झालेल्या गोळीबारात सीमासुरक्षा दलाच्या एका जवानाचा मृत्यू झालाय.
दोन्ही देशाचे पंतप्रधान आज भेटण्याच्या तयारीत असताना दहशतवाद्या या भेटीचा निषेध व्यक्त करण्यासाठी ही आगळीक केली असावी, असा अंदाज आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासकांनी व्यक्त केलाय.
मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झालीय.
दोन्ही देशांचे संबंध पुन्हा प्रस्थापित होण्याच्या प्रयत्न सुरु होतायत. त्यात पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्यानं पाकिस्तान मैत्री पात्र आहे का? अशी चर्चा सध्या सुरू आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.