कॅनडात अण्णांना एक लाख डॉलर्सचा पुरस्कार!

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचा ‘आंतराष्ट्रीय प्रामाणिकपणा’साठी कॅनडामध्ये विशेष सत्कार करण्यात आलाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 27, 2013, 07:39 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचा ‘आंतराष्ट्रीय अखंडत्व'कडून कॅनडामध्ये विशेष सत्कार करण्यात आलाय. एक लाख डॉलरर्सचा हा पुरस्कार जगातील भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी आणि मानवाधिकरांना प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात येणारा सर्वात मोठा पुरस्कार ठरलाय.
कॅनडाच्या वैंकुवरमध्ये गुरुवारी एका विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये अण्णांना एका विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. ब्रिटीश कोलंबिया विश्वविद्यालयाच्या ‘फॅकल्टी ऑफ लॉ’नं त्यांना हा पुरस्कार प्रदान केला.

या पुरस्कारानंतर भ्रष्टाचाराशी लढण्यासाठी आणि पारदर्शक कारभार निर्माण करण्यासाठी आम्हाला आणखी प्रोत्साहन मिळालंय, असं अण्णांनी हा पुरस्कार स्वीकारताना म्हटलंय. सोबतच, मी कधीही पैशांमागे धावलो नाही पण हा अॅलॉर्ड पुरस्कार मला आणि या उद्देशानं काम करणाऱ्यांना मोठी मदत ठरणार आहे, असंही अण्णांनी म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.