नवी दिल्ली : 'हिममानव' च्या रहस्यावरून आता पडदा उठला आहे. एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार एका गिर्यारोहकाने भुटानमध्ये हिममानवाच्या पायांचे ठसे पाहिले आहेत. त्याने त्याचा एक फोटो देखील काढला आहे.
माणसाच्या पायाच्या आकारापेक्षा याचा आकार मोठा असल्याने ते हिममानवाच्याच पायाचे ठसे असल्याचं म्हटलं जात आहे. ते कोणत्याही प्राण्याच्या पायाचे ठसे नाहीत कारण बर्फाळ प्रदेशात राहणारा कोणताही प्राणी दोन पायांवर चालत नाही.
भुटानमधील सर्वात उंच शिखर गंगखार पुनसूम येथे हे ठसे आढळले आहेत. या गिर्यारोहकाने त्याच्या डोळ्याने हे ठसे पाहिले आहेत. या आधीही ११ वर्षापूर्वी एका गिर्यारोहकाने एका हिममानवाला पाहिल्याचा दावा केला आहे.