तरुणीने फेसबूकवर दिली गुन्ह्याची कबुली

सोशल नेटवर्किंग साईट फेसबूकवर आज जगातील अनेक लोक मोठ्या प्रमाणात आहेत. कोणी फोटो शेअर करतं, तर कोणी स्टेटस...पण फेसबूकवर कोणी गुन्ह्याची कबुली देतांना पाहिले आहे का ? पण असं झालंय. 

Updated: Jan 19, 2016, 09:34 PM IST
तरुणीने फेसबूकवर दिली गुन्ह्याची कबुली title=

न्यूयॉर्क : सोशल नेटवर्किंग साईट फेसबूकवर आज जगातील अनेक लोक मोठ्या प्रमाणात आहेत. कोणी फोटो शेअर करतं, तर कोणी स्टेटस...पण फेसबूकवर कोणी गुन्ह्याची कबुली देतांना पाहिले आहे का ? पण असं झालंय. 

कॅलिफोर्नियामधील हेमेत येथील एका युवतीने फेसबूकवर प्रियकराच्या खुनाची कबुली दिली आहे. यानंतर युवतीला अटक करण्यात आली आहे अशी माहिती मीडियामधून आली आहे.

नकासिया जेम्स या18  वर्षाच्या युवतीने, एका चाकुने त्याची हत्या केली, तो मृत पावल्याचं कळल्यानंतर तेथून पळ काढला, डोरियन मला माफ कर. असं तिने म्हटलं आहे. काही काळानंतर तिने ती पोस्ट फेसबूकवरून हटवली पण तोपर्यंत ती गोष्ट पोलिसांपर्यंत पोहोचली होती.