एक असा देश जिथे मुली १२ व्या वर्षी होतात मुलगा!

 एक असा देश ज्या ठिकाणी मुली १२ व्या वर्षी मुलगा होतात. तरूणाई गेल्यावर तरूणांचा आवाज जड होतो आणि मूड प्रत्येक गोष्टीवर बदलत असतो हे आपल्याला माहीत आहे. पण डोमिनिक गणराज्याचा एक भाग असा आहे त्यात असे काही बदल होतात की जे जगात कुठेच होत नाही. किशोर अवस्थेत म्हणजे १२ व्या वर्षानंतर मुलांचे लिंग विकसीत होते. यापूर्वी त्या मुलाला मुलगी समजत असतात. 

Updated: Sep 22, 2015, 03:59 PM IST
एक असा देश जिथे मुली १२ व्या वर्षी होतात मुलगा! title=

लंडन :  एक असा देश ज्या ठिकाणी मुली १२ व्या वर्षी मुलगा होतात. तरूणाई गेल्यावर तरूणांचा आवाज जड होतो आणि मूड प्रत्येक गोष्टीवर बदलत असतो हे आपल्याला माहीत आहे. पण डोमिनिक गणराज्याचा एक भाग असा आहे त्यात असे काही बदल होतात की जे जगात कुठेच होत नाही. किशोर अवस्थेत म्हणजे १२ व्या वर्षानंतर मुलांचे लिंग विकसीत होते. यापूर्वी त्या मुलाला मुलगी समजत असतात. 

हे ठिकाण डोमिनिक गणराज्यच्या दक्षिण पश्चिमेला आहे. एक वेगळं पडलेले खेडे आहे. ज्याने नाव सालिनास आहे. बीबीसीच्या विज्ञान सिरीज 'काउंटडाउन टू लाइफ-द एक्स्ट्राऑर्डनरी मेकिंग ऑफ यू' मध्ये सालिनासच्या मुलांची कहाणी दाखविण्यात आली. टेलिग्राफ डॉट को डॉट यूके ने दिलेल्या बातमीनुसार सालिनासमध्ये ९० पैकी एका मुलामध्ये एक दुर्मिळ अनुवांशिक आजार आढळून येतो. 

या गावात अशा मुलांना गुएवेडोसेस म्हणून ओळखले जातात ज्याचा अर्थ १२ वर्षी लिंग येणारा.... बातमीनुसार या आजारामुळे एक एनझाइम तयार होत नाही. त्यामुळे गर्भाशय़ात पुरूषाचे स्केस हार्मोन-डिडाइज्रो टेस्टोसटेरोन तयार होत नाही. त्यामुळे असा मुलगा जन्मानला आल्यावर त्याल अंडकोष नसते, त्यामुळे त्याच्या शरिरावर योनी असल्यासारखे वाटते. १२ व्या वर्षी टेस्टोस्टेरोन वाढते आणि त्यामुळे पुरूषाचे जननांग दिसू लागते. 

जी गोष्ट आईच्या गर्भात व्हायला हवी ती १२ वर्षांनंतर होते. त्यानंतर या मुलांचा आवाज जड होतो. त्यानंतर त्यांना सामान्य लिंग प्राप्ती होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.