पॅरिस : ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पॅरिसमध्ये जागतिक संम्मेलन आयोजित केलंय. या परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह जगभरातील दिग्गज नेते उपस्थित राहत आहेत.
जगातलं सर्वात मोठं संमेलन पॅरिस नगरीत सुरु होतंय. जगभरातले दिग्गज नेते ग्लोबल वर्मिंगच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पॅऱिसमध्ये जमायला सुरूवात झालीय. पृथ्वीचा निवासी, ग्लॉबल वर्मिंगचा साक्षीदार आणि बळीही आहे. क्षणोक्षणी बदलणाऱ्या पर्यावरणामुळे आपली शहरं, खेडी, शिवारं, नद्या, समुद्र, सारं काही प्रभावित होतंय.
क्लायमेट सेंट्रल या खासगी संस्थेच्या अहवालानुसार जर पृथ्वीचं तापमान ४ अंश सेल्शियसनं वाढलं तर जगातली अनेक शहरं गायब होतील. समुद्राची पातळी ८.९ मीटरनं वाढेल. त्यामुळे समुद्राचं पाणी शहरात येईल. त्यामुळे जगातले ७६ कोटी लोक प्रभावित होणार आहे. जर हेच तापमान दोन अंशांनी वाढलं, तरी सागराची पातळी ४.७ मीटरनं उंचावेल. आणि २८ कोटी लोक प्रभावित होतील
पृथ्वीचं तापमान दिवसेंदिवस वाढतंय. कुठे दुष्काळ तर कुठे पूराची स्थिती आहे. जगाच्या पाठीवर सगळीकडेच मानवाचं जगणं कठिण होत चाललंय. क्लायमेट सेंट्रलनं आपल्या अहवालात, तापमान वाढल्यानं नष्ट होणाऱ्या शहरांच्या यादीत मुंबई आणि कोलकाता ही शहरं सामील केली आहेत.
२ डिग्री सेल्सियस तापमान वाढलं तर न्यूयॉर्कची १३ टक्के लोकसंख्या प्रभावित होईल. तर ४ डिग्री तापमान वाढीमुळे २३ टक्के न्यूयॉर्कवासियांना फटका बसेल. लंडनमध्ये दोन डिग्री सेल्सियन तापमान वाढल्यावर ८ टक्के नागरिकांची वाताहात होईल तर चार डिग्री तापमान वाढीमुळे १३ टक्के लंडनवासियांना फटका बसेल.
इकडे मायनगरी मुंबईपुरीचं तापामन २ डिग्री सेल्सियसनं वाढलं, तर शहरातील तब्बल ३९ टक्के नागरिकांचे हाल होतील आणि पारा चार डिग्री सेल्सियसनं वाढला तर निम्मी मुंबई पाण्याखाली जाईल.कोलकात्यातही दोन डिग्री पारा चढल्यानं २४ टक्के आणि चार ड़िग्री तापमान वाढीनं ५१ टक्के जनता देशोधडीला लागेल.
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनीही ग्लोबल वॉर्मिंगविरोधात जगानं एकत्र येण्याची विनंती केलीय.आता आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. जसं की आपल्या मुलाला ताप आल्यावर आपण शरीराचं तापमान कमी करण्यासाठी प्रयत्न करतो. अगदी तसचं आता हवामान बदलावर आता कडक कारवाई करण्याची गरज आहे. २००९ मध्ये कोपेनहेगन सम्मेलनात ग्लोबल वॉर्मिंग विरोधात ठोस निष्कर्ष समोर आले नव्हते. मात्र यंदाच्या संम्मेलनात आशा आहेत. संपूर्ण जग ग्लोबल वॉर्मिंग विरोधात जागतिक युद्ध छेडण्यात यशस्वी होईल अशी आशा करूया.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.